*सौ. संध्या तेरसे यांनी केलेल्या प्रयत्नाना यश*
*💫कुडाळ दि.१६-:* जिल्हा क्रीडा विभागाच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत कुडाळ नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सौ. संध्या तेरसे यांच्या मागणी आणि पाठपुराव्याने कुडाळ नगरपंचायतीस मंजूर झालेल्या ओपन जिम चा शुभारंभ हिंदू नववर्षाचे औचित्य साधत हिंदू कॉलनी कुडाळ येथे करण्यात आला आहे. यावेळी कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, हिंदू कॉलनी मित्रमंडळ अध्यक्ष अशोक मालवणकर यांच्या मुख्य उपस्थितीत गिर्यारोहक व उत्कृष्ट खेळाडू डॉ. जयसिंग रावराणे व बॅडमिंटन खेळाडू सौ. अर्चना गोरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम करण्यात आला आहे. आरोग्याच्या दृष्टीने लहान थोर सर्वानाच उपयुक्त असे ओपन जिम सुरू करण्यासाठी सौ. संध्या तेरसे यांनी गेली दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा करत विशेष प्रयत्न केले होते.
