तळीरामांची विकृत कृती;ब्यूटी ऑन व्हील्सने केली स्वच्छ्ता
*💫मालवण दि.१६-:* पांडव पाऊलखुणांच्या भूमीत तळी रामानी रित्या करुन फेकलेल्या काचेच्या बाटल्या ‘ब्युटी ऑन व्हील्स’ ने एकत्र करून केली परिसराची स्वच्छता. पेंडूर आपधारणा माळ परिसरात बरीशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. पांडवांची पाऊले ,आपधारणा टेकडी ,पाझर तलाव ,बाजूला पेंडूर तलाव अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी परिसरातील अनेक लोक आपल्या कुटुंबासमवेत फिरायला येतात. तसेच सकाळी मॉर्निंग वॉकसाठी, सायकलिंग साठी किंवा रनिंग साठी अनेक जण येत असतात. याच परिसरात तळीरामांनी उच्छाद मांडला आहे . तळीरामांची ही काच श्रीमंती परिसराची अस्वच्छता निर्माण करण्याबरोबर लोकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत हे तळीराम दारूच्या बाटल्या रित्या करून तशाच फेकून देत आहेत .त्याच बरोबर काही पार्टी शौकिनही याच परिसरात पार्टीनंतर चे काव्य तेथेच टाकून जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे .ब्युटीज आॅन व्हिल्सचे सदस्य या परिसरात सायकलिंग रनिंग मॉर्निंग वाॅक करतात . या पवित्र परिसराचे विदारक चित्र पाहून ब्युटी आॅन व्हिल्स सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला .यामध्ये डॉक्टर सोमनाथ परब ,संजय नाईक ,प्रकाश सरमळकर ,सुरेश कांबळी, निलेश हडकर ,सतीश कांबळी,रुपेश भोजणे, बंडू माडये, अनिल पाटील, महादेव हडकर ,अर्जुन हडकर इत्यादी सदस्य सहभागी झाले. उर्वरित परिसर पुढील टप्प्यात स्वच्छ करण्याचा मनोदय असल्याचे तसेच हा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे मत ब्युटीज आॅन विल्स चे अध्यक्ष डॉक्टर सोमनाथ परब यांनी व्यक्त केले.
