दीपक केसरकर सावंतवाडीचे नेते म्हणून शोभतात; त्यामुळे त्यांचा विजय निश्चित…

निलेश राणे: तुम्हाला जी मदत लागेल ती मदत राणें कुटुंब करणार..

⚡सावंतवाडी ता.२९-: दीपक केसरकर हे शांत संयमी सुसंस्कृत सावंतवाडीतील नेते म्हणून शोभून दिसतात , हे मी तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही, त्यामुळे दीपक केसरकर यांचा विजय निश्चितच आहे. असा विश्वास निलेश राणे यांनी आज व्यक्त केला.

दीपक केसरकर यांच्या समोर जे उमेदवार उभे आहेत ते त्यांच्या उंचीचे देखील नाहीत. असा टोला देखील विरोधकांना लगावला आहे. यावेळी तुम्हाला जी मदत लागेल ती मदत राणे कुटुंब आणि आमचे सर्व कार्यकर्ते करतील असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले आहे. लोकसभेच्या वेळी दीपक केसरकर यांनी केलेल्या कामाची परतफेड आता विधानसभेला करायची आहे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.

You cannot copy content of this page