सावंतवाडी तालुक्‍यात आज कोरोनाचे २५ रुग्ण सापडले…

*सावंतवाडी दि.१५-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन २५ रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात १५ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सबनीसवाडा १, सालईवाडा ७, खासकीलवाडा २, तर ग्रामीण भागात नेमळे, रोणापाल, डिंगणे, शेर्ले, बांदा, इन्सुली, सांगेली, कुणकेरी, आंबोली, या गावात प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडले असून, पाडलोस ४, माजगाव २ रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ७६ सक्रिय रुग्ण आहेत.

You cannot copy content of this page