ह्यूमन राइट्सच्या वेंगुर्लेकर यानी वेधले क्लास संचालकांचे लक्ष;मुलांना घराबाहेर न पडण्याच्या दिल्या सूचना
*💫सावंतवाडी दि.१५-:* शहरात एका कोचींग क्लासमध्ये दहावीचे विद्यार्थी पुर्वतयारीचे पेपर चेकिंगसाठी आणून देत होते. हा प्रकार ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्टचे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांना समजताच त्यानी घटनास्थळी धाव घेतली. संचारबंदी असाताना मुलं टू व्हीलर गाड्या घेऊन त्या कोचींग क्लासमध्ये पेपर आणून देत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं १४४ कलम लागलं असताना मुलं घराबाहेर पडत असल्यानं अमित वेंगुर्लेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर त्या क्लासच्या संचालकांची भेट घेत हा प्रकार त्यांना सांगितला. तर लॉकडाऊन काळात मुलांना बाहेर पडण्यास सांगू नये अशी सुचना त्यानी दिला आहे. त्यानंतर कोचींग क्लासच्या संचालकांनी विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान, ही मुल लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचीच असल्याचं आढळून आली आहेत.
