विजयदुर्ग-देवगड मार्गावरिल वाडा सडेवाडीतील दुर्दैवी घटना
देवगड-: टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वार संजय दत्तात्रय जोशी ( ५०) व सौ. सायली संजय जोशी (४७) दोन्ही रा. नाडण हे पतीपत्नी ठार झाले आहेत. हा अपघात गुरुवारी दुपारी ३.३० वा सुमारास विजयदुर्ग- देवगड सागरी महामार्गावर वाडा सडेवाडी येथे घडला आहे कोविडची लस घेण्यासाठी जोशी दांपत्य देवगड ग्रामीण रुग्णालयात येत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, सहायक पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, हवालदार फकरुद्दीन आगा,गणेश चव्हाण आदींनी घटनास्थळी पंचनामा केला.
