राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत देवगडच्या सुकन्या प्रांजली वाडेकर हिचे यश…

देवगड (प्रतिनिधी)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे महाराष्ट्र राज्य अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा नांदेड येथे १८ ते २० ऑक्टोंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंग क्रीडा संकुल येथे संपन्न झाली. या स्पर्धेत TWJ आर्चरी ॲकडमी, पुणेची धनुर्धर कु. प्रांजली संजय वाडेकर ( रा. वाडातर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग ) हिने सांघिक प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले. ती श्री शाहू मंदीर महाविद्यालय पर्वती, पुणे येथील विद्यार्थिनी आहे.
या तिच्या यशात प्रशिक्षक ओंकार घाडगे, राहुल पवार व मयेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page