⚡मालवण ता.२३-: मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाच्या सभेत २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी अजित वसंत गवंडे यांची तर सचिव पदी दामोदर मैनाजी गवई यांची निवड करण्यात आली.
मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे – उपाध्यक्ष श्रीकांत राजाराम वेंगुर्लेकर, सहसचिव सुरेश बापू चव्हाण, खजिनदार रघुनाथ पुरुषोत्तम मोंडकर, सदस्य – मंगेश विठ्ठल शेर्लेकर, मनाली इब्रामपूरकर, शलाका सदाशिव गावकर, सुबोध आत्माराम केळूसकर, शिवराम यशवंत राणे, महेश विठोबा पाटील, सल्लागार – अशोक नारायण ओटवणेकर, बस्त्याव कारवालो यांची निवड करण्यात आली.
या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमण सोहनी यांनी काम पाहिले. यावेळी सर्वांच्या सहकार्याबद्दल मावळते अध्यक्ष मंगेश शेर्लेकर यांनी आभार मानत नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
