Headlines

असंघटित कामगारांना मिळणार रेशनकार्ड…

⚡मालवण ता.२३-:
केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवरील
नोंदणीकृत असंघटित कामगारांना रेशनकार्ड देण्याचीकार्यवाही मालवण तहसील कार्यालयातर्फे करण्यातयेणार आहे. यामुळे मालवण तालुक्यातील असंघटितकामगारांनी केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी केलेली असल्यास आणि त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्यास त्यांनी तात्काळ मालवण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले आहे.

न्यायालयाच्या आदेशाने असंघटित कामगारांनाशिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहे. यात ज्या व्यक्ती पात्र आहेत आणि संबंधित केंद्रशासितप्र देशांद्वारे तपासणी झाली आहे, त्यांना १९ नोव्हेंबरपूर्वी शिधापत्रिका जारी करणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना ताबडतोब अन्नधान्य पुरविले जाणार आहे. ज्या राज्यांमध्ये स्थलांतरित कामगारांना व्हेरिफिकेशन होऊनही तसेच न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही १९ नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी रेशनकार्ड वितरित केले गेले नाहीत, याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी संबंधित राज्याच्या सचिवांनी पुढील सुनावणीच्या तारखेला सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित राहवे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

You cannot copy content of this page