मालवण (प्रतिनिधी)
मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आम. वैभव नाईक यांनी आज मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण व श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्याबरोबरच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक यांच्या विजयाची हॅट्रिक व्हावी त्याचबरोबर ते जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत असे गाऱ्हाणे यावेळी ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने घालण्यात आले. विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास यावेळी आम. नाईक यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीतर्फे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आम. वैभव नाईक हे दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज आम. नाईक यांनी मालवण देऊळवाडा येथे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला श्रीफळ अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी रामेश्वर चरणी साकडे घालून प्राचाराचा शुभारंभ केला. यावेळी श्री देव रामेश्वर देवस्थानचे मानकरी तसेच गावकर मंडळींच्या वतीने आम. नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्री देव रामेश्वर बरोबरच श्री देव नारायण, श्री देवी सातेरी मंदिरात जाऊनही वैभव नाईक यांनी दर्शन घेतले.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, नंदू गवंडी, मंदार ओरसकर, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, सेजल परब, पूनम चव्हाण, नीनाक्षी शिंदे, दीपा शिंदे, शिल्पा खोत, यतीन खोत, निना मुंबरकर, गणेश कुडाळकर, किशोर गावकर, पियुष चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, मेघनाद धुरी, संदेश कोयंडे गौरव वेर्लेकर, भगवान लुडबे, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, माधुरी प्रभू, सुर्वी लोणे, रविकिरण आपटे, रश्मी परुळेकर, विद्या फर्नांडिस, अंजना सामंत, मोहन मराळ, यशवंत गावकर, दत्ता पोईपकर, अक्षय रेवंडकर, गौरव वेर्लेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदारकीच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे मतदार संघातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असून या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास यावेळी आम. नाईक यांनी व्यक्त केला.
