मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन…!

मालवण (प्रतिनिधी)

नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे मालवण तालुकास्तरीय खुली वाचक स्पर्धा बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. सुप्रसिध्द साहित्यिक कोकणपुत्र जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धेचा विषय ‘जयवंत दळवी यांची कोणतीही साहित्यकृती’ हा आहे.

ही स्पर्धा वय वर्षे १६ व त्यावरील स्पर्धकांसाठी खुली आहे. स्पर्धेतील विजेत्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख रक्कमेची पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. प्रथम तीन विजेत्यांना जिल्हा ग्रंथालय कुडाळ येथे दि. ०१ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत भेट सहभाग मिळेल.

इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे दि. २२ नोव्हेंबर पर्यंत संजय शिंदे – ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण याठिकाणी पाठवावी. अधिक माहितीसाठी संपर्क ८३९०६९४३३१ व ९४२२२३४९५० या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपाध्यक्ष उदयराव मोरे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page