इन्सुली चेकपोस्टवर कारवाई: 17 लाख 15 हजारचा मुद्देमाल जप्त…
⚡बांदा ता.२२-: गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर आज बांदा इन्सुली येथील चेकपोस्टवर कारवाई करत 50 बॉक्स दारु जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत बोलेरो पीकअप सह 17 लाख 15 हजार 900 रुपयाचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत मुंबई येथील वाहन चालक वलेरियाने ब्रगजा याला ताब्यात घेण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोज शेवरे यांनी केली आहे.
