सूत्रांची माहिती;राजन तेली यांच्या कार्यालया बाहेर कार्यकर्त्याची गर्दी
⚡सावंतवाडी ता.२२-: राजन तेली यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज सायंकाळपासून त्यांच्या कार्यालया बाहेर गर्दी केली आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची उमेदवारी जाहीर होणार असून, पक्षाचा एबी फॉर्म देखील त्यांना देण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
