नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा आरोप
*💫सावंतवाडी दि.१५-:* शहरात बसविण्यात आलेल्या वॉटर एटीएम मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेविका सौ अनारोजीन लोबो यांनी केला आहे. शहरात तीन वॉटर ए टी एम बसविण्यात आले असून याचा खर्च अंदाजे १० लाख पर्यंत होणे शक्य आहे. परंतु संबंधित ठेकेदाराकडून सुमारे २९ लाख ५०० रुपयाचे बिल बनविण्यात आले आहे. यावर शिवसेना गटनेत्या तथा ज्येष्ठ नगरसेविका सौ अनारोजीन लोबो यांनी आक्षेप घेत या कामात मोठा भ्रष्टचार झाला असल्याचा आरोप केला आहे.
