संकटे आले तरी विकासकामे थांबणार नाही…

तालुकाप्रमुख रुपेश राऊळ ः डेगवे बाजारवाडी सार्वजनिक विहिरीचे भूमिपूजन

*💫बांदा दि.१५-:* विरोधक कितीही बोंबलले तरी विकासकामे ही शिवसेनाच करू शकते हा जनतेला विश्वास आहे आणि हाच विश्वास मतदानावेळी दाखवून विरोधकांना घरी बसवले आहे. कितीही संकटे आली तरी जनतेला अपेक्षित विकास थांबणार नसून सुरूच राहणार असल्याचे पं.स.सदस्य तथा शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले. डेगवे बाजारवाडी सार्वजनिक विहिरीचे भूमिपूजन गुढीपाडव्यादिवशी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष उत्तम देसाई, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, माजी सरपंच मंगलदास देसाई, डेगवे मंडळ सरचिटणीस उल्हास देसाई, देवस्थान मानकरी मधुकर देसाई, प्रेमानंद देसाई, ग्रा.पं.सदस्य वैशाली आंबेरकर, वैशाली देसाई तसेच ग्रामस्थ सुर्याजी देसाई, मोहन देसाई, वामन देसाई, नवनीत देसाई आदी उपस्थित होते. श्री.राऊळ म्हणाले की, अनेक वर्षांपासून या ठिकाणी सार्वजनिक विहिरीची मागणी होत होती. याकडे दखल घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून ती पूर्णत्वास येत आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तालु्नयातील विकासकामे सुरूच राहणार. कोरोनाचा परिणाम विकासकामांवर होणार नसून कितीही संकटे आली तरी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार. जनतेने विरोधकांना घरी बसवल्याने ते बेताल वक्तव्ये करत आहेत. अशा वक्तव्यांना आपण भीक घालत नसून जनतेच्या मागण्यांना प्राधान्य देणार असल्याचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले.

You cannot copy content of this page