मालवणात कानठळ्या बसविणारा आवाज…

स्फोट सदृश्य आवाजाने मालवण हादरले;कारण गुलदस्त्यात

*💫मालवण दि.१५-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून मिनी लॉक डाऊनची अमंलबजावणी सुरू असतानाच मालवणात आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने मालवण हादरले आवाज एव्हढा मोठा होता की तो आवाज नेमका कशाचा याचे उत्तर शोधण्यासाठी प्रशासनासह नागरिकही कामाला लागले मात्र दुपार झाली तरी सारेच अनभिज्ञ होते मालवण तालुक्यात अनेक ठिकाणी आज सकाळी हा भला मोठा आवाज ऐकू आला. मालवण शहरासह वायरी, तारकर्ली, कोळंब, कातवड, आनंदव्हाळ, हडी, आचरा, कुंभारमाठ, कट्टा, मसुरे, देवबाग आदी व इतर ठिकाणच्या नागरिकांनी हा आवाज ऐकला. या या आवाजाच्या वेळी काहींच्या घराचे दरवाजे, खिडक्या, पत्रे, घरातील सामान हलले अशी माहिती काही नागरिकांनी दिली आहे. मात्र हा आवाज नेमका कसला हे कळू शकलेले नाही. भूकंप झाल्याचा अंदाज काहीजण व्यक्त करत आहेत. तर हा आवाज किनारपट्टी भागातून आला असल्याचे काहीनी सांगत समुद्रात स्फोट झाल्याने किंवा समुद्रातील हालचालींमुळे हा आवाज झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र आवाजा बाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

You cannot copy content of this page