निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवणात पोलिसांचे संचलन…!

⚡मालवण ता.२१-: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे दर्शविण्यासाठी आज कट्टा व मालवण शहरात पोलीसांनी संचलन केले. यामध्ये पोलीसांसोबत केंद्रीय राखीव दलाचे जवानही सहभागी झाले होते.

राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. यासाठी सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये, कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश जनतेला देण्यासाठी आज सायंकाळी पोलीसांकडून कट्टा व मालवण शहरात संचलन करण्यात आले. मालवण शहरात बस स्थानक ते भरड व बाजारपेठ मार्गे बंदर जेटी या मार्गावर संचलन करण्यात आले. यामध्ये कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस अधिकारी व कर्मचार तसेच केंद्रीय राखीव दलाचे जवान सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page