आंबोली कामतवाडी येथे प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा बदलीनिमित्त सत्कार…

आंबोली,ता.२२: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामतवाडी येथे आंतरजिल्हा बदलीने कोल्हापूर येथे बदली झालेल्या श्री.मधू कोले सर व जिल्हांतर्गत बदलीने आंबोली नं.१ बाजारवाडी येथे रुजू झालेल्या श्रीम. अनिता साबळे मॅडम यांचा सत्कार समारंभ आंबोली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. आर्.बी.गावडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनिल गावडे,साबा गावडे, मधुकर गावडे ,पालक,सदस्य, ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
येथिल शाळेत श्री. कोले सर यांनी मार्च २0१६ ते ऑगस्ट २0२४/पर्यंत व श्रीम.अनिता साबळे यांनी २0१४ पासुन २०२४ पर्यंत शिक्षकाचे काम केले.या कार्यकालात शाळेत डिजिटल शाळा, संगणक, प्रिंटर , के- यान प्रोजेक्टर , इमारत बांधकाम ,शालेय रंगरंगोटी ,किचनशेड ,स्टेज , शाळेमोरील शेड या विविध भौतिक गरजा प्रशासन तसेच पालकांच्या सक्रिय सहभागातुन पुर्णत्वास नेऊन शाळा सुंदर झाली तसेच अध्ययनाचे काम चांगले केले.यावेळी विद्यार्थी व पालक यांनी आपल्या मनोगतात कोले सर व श्रीम. साबळे यांच्या शाळेतील विविध आठवणींना उजाळा दिला . आंबोली केंद्रप्रमुख श्री. आर.बी.गावडे सर यांनी शाळेतील भौतिक विकास व विद्यार्थी गुणवत्ता याबाबत शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
शाळा व्यवस्थापन समिती , आजी- माजी विद्यार्थी , शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व शिक्षकवृंद यांच्यावतीने दोन्ही शिक्षकांना फेटा, शाल , श्रीफळ , सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला.पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात केंद्रप्रमुख आर्.बी.गावडे यांच्याकडून दोन्ही शिक्षकांना पेहराव व भेटवस्तू विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय श्रीम. शितल परुळेकर मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.अवधूत जाधव सर यांनी मानले.

You cannot copy content of this page