हरकुळ ( बु.) माजी सरपंच रमेश पावसकर यांचे अकाली निधन…

*💫कणकवली दि.१५-:* हरकुळ ( बु .) गावचे माजी सरपंच, भाजपा कणकवली तालुकाचे विद्यमान सरचिटणीस तथा भाजपा जिल्हा सरपंच संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश सूर्यकांत पावसकर ( वय 40 ) यांचे हार्ट अटॅक ने दुःखद निधन झाले. मुंबई येथे आपल्या कुटुंबियांसह पावसकर सध्या राहत होते. मुंबई येथील घरात टीव्ही पाहत असताना बुधवारी रात्री अचानक त्यांना सिव्हीयर हार्ट अटॅक आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चत पत्नी, मुलगा, आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे. रमेश यांच्या अकाली निधनाने हरकुळ ( बु.) गावात शोककळा पसरली आहे.

You cannot copy content of this page