अँड परिमल नाईक यांनी फुक्याचे श्रेय घेऊ नये…

माधुरी वाडकर : रेलींगच्या कामावरून श्रेय वादाचे राजकारण

*सावंतवाडी-:* डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी बसविण्यात आलेले रेलींगचे काम हे समाज कल्याण समितीच्या माध्यमातून आणि समाज कल्याण समिती सभापती नगरसेविका सौ माधुरी वाडकर यांच्या पाठपुराव्यातून करण्यात आले असून, नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी उगाचच श्रेय वादाचे राजकारण करू नये असा टोला नगरसेविका सौ माधुरी वाडकर यांनी लगावला आहे. मागासवर्गीय समाजासाठी आता पर्यंत कोणते काम केले हे त्यानी जाहीर करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी दिले आहे. समाज कल्याण समितीचे सदस्य देखील नसताना मागासवर्गीय समाजासाठी होणारी कामे ही आपणच पाठपुरावा करून करत असल्याचा दिखाऊपणा त्यानी करू नये. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

You cannot copy content of this page