ओटवणेत दारू वाहतूक कारचा अपघात..

सिंधुदुर्ग एक्साइज भरारी पथकाची कारवाई

*💫बांदा दि.१४-:* गोव्यातून ओटवणेमार्गे गोवा बनावटीची दारु वाहतुक करणार्‍या कारचा थरारक पाठलाग करुन उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने ३ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पावसामुळे निसरडा रस्ता झाल्याने कारचा अपघात झाला व संशयित आयताच एक्साइजच्या जाळ्यात सापडला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी तारेंद्र राजाराम पार्सेकर (रा. बार्देश गोवा) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार (एमएच ०८ झेड ००२४) ताब्यात घेण्यात आली. बांदा – दाणोली मार्गावर ओटवणे तिठा येथे मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग भरारी पथकाचे निरीक्षक एस. के. दळवी, दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, जवान डी. आर. वायदंडे, आर. एस. शिंदे यांच्या पथकाने केली. अधिक तपास डी. एम. वायदंडे करीत आहेत.

You cannot copy content of this page