देवगड वाघोटन येथील खळबळजनक घटना;छातीत चाकू खुपसला
देवगड : प्रतिनिधी वाघोटन येथील जिक्रिया अली बोरकर(८५) या वृध्दाने भांडणाच्या रागातून तेथिलच मूस्ताक उस्मान काझी(७३) वृध्दाचा छातीत चाकू खुपसून खुन केल्याची घटना वाघोटन बाजारपेठ येथे १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.१५ वा.सुमारास घडली.याप्रकरणी विजयदूर्ग पोलिसांनी संशयित जिक्रीया बोरकर याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कसबा वाघोटन येथील जिक्रिया अली बोरकर(८५) व मूस्ताक उस्मान काझी(७३) यांच्यामध्ये १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.१५ वाजता वाघोटन बाजारपेठ येथील समीर मुल्ला यांच्या घरासमोर किरकोळ कारणावरुन भांडण झाले. या रागातून जिक्रिया अली बोरकर यांनी लोखंडी चाकू मूस्ताक उस्मान काझी यांच्या छातीमध्ये डाव्या बाजुला खुपसला.यावेळी रक्ताचा थारोळ्यात मुस्ताक काझी पडले असताना बाजारपेठेतील नागरिकांनी धाव घेतली.दरम्यान मुस्ताक काझी यांचा मुलगा सल्लाउद्दीन घटनास्थळी गेला यावेळी चाकू खुपसल्याने गंभीर जखमी असलेल्या वडीलांना तात्काळ उपचारासाठी देवगड येथे नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. याबाबत विजयदूर्ग पोलिस स्टेशनला कळविल्यानंतर विजयदुर्ग पोलिस घटनास्थळी जावून संशयित जिक्रीया बोरकर यांना ताब्यात घेतले.पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन कट्टेकर यांनीही घटनास्थळी जावून माहिती घेतली. याप्रकरणी चाकू खुपसल्याने मृत्यु झालेल्या मुस्ताक काझी यांचा मुलगा सल्लाउद्दीन मुस्ताक काझी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित जिक्रीया अली बोरकर याच्याविरूध्द भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.तपास पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन कट्टेकर करीत आहेत.
