*💫सावंतवाडी दि.१५-:* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वी फॉर यू या संस्थेने इसेंशियल ड्रॉप या उपक्रमाचा सावंतवाडी येथे शुभारंग करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष व जिल्हाबार असोसिएशन चे माजी अध्यक्ष अँड दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते “Essention Drop” चा शुभारंभ करण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पशू पक्षी मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडताना दिसून येत आहेत. आशा वेळी पक्षांसाठी सावंतवाडी येथे जागोजागी खाद्य आणि पाणी असलेले फिटर्स बसवण्यात आले आहेत. वी फॉर यू या संस्थेचे कार्य खरोखरचं आदर्शवत आहे. असे उद्गार अँड दिलीप नार्वेकर यांनी काढले आणि कार्यक्रमास शुभेच्छा ही दिल्या आहेत. संविधानिक हक्कानं बद्दल जसे जागृक आहात तसेच कर्तव्यानंबद्दलही जागृक रहा, पशू-पक्षांचे संगोपन करणे हे आपले कर्तव्य आहे. सुरुवात आपल्या घरापासून करूया असे आव्हान We For You चे अध्यक्ष अँड संकेत अभय नेवगी यांनी केले आहे. यावेळी सौ. व श्री. अँड. दिलीप नार्वेकर, वी फॉर यू चे अध्यक्ष अँड. संकेत नेवगी, उपाध्यक्ष संपदा तुळसकर ,सचिव अँड श्री स्वप्नील कोलगावकर, सहसचिव अमेय महाजन, खजिनदार मिहीर मोंडकर, अँड श्रध्दा राऊळ, अँड सायली चव्हाण, अँड दत्तप्रसाद नाटेकर, तन्वी चव्हाण आदी उपस्थित होते.
सावंतवाडीत इसेंशियल ड्रॉप’ उपक्रमाचा शुभारंभ
