आरोग्य यंत्रणेकडे ३० बेड शिल्लक पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
गेल्या तीन दिवसांत हजार रुग्ण मिळाले आहेत. मात्र, याचवेळी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे केवळ ३० बेड शिल्लक आहेत. त्यामुळे आज जिल्ह्यातील एसएसपीएम मेडिकल कॉलेज, तायशेटे दवाखाना, महिला रुग्णालय व होम गार्ड कार्यालय या ठिकाणी नव्याने २०२ निर्माण करण्यात आले आहेत. तसेच मालवण येथील झाट्ये दवाखाण्यात कोविड सेंटरला परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यानी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री सामंत यानी बुधवारी जिल्ह्यातील जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष पदाधिकारी यांची १५ दिवसांच्या लॉकडाऊन संदर्भात बैठक घेतली. तसेच जिल्ह्यातील टास्क फोर्स व खाजगी डॉक्टर यांची कोरोना नियंत्रणा बाबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी झूमच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुढे बोलताना मंत्री सामंत यानी, जिल्ह्यातील सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. या बैठकीला खा विनायक राऊत, आ वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते, असे सांगत सामंत यानी यावेळी खा राऊत यानीही आपली भूमिका विषद केल्याचे सांगितले. मंत्री सामंत यानी पडवे येथील एस एस पी एम मेडिकल कॉलेजमध्ये ५० बेड घेण्यात आले आहेत. तायशेटे हॉस्पिटलमध्ये बारा बेड घेण्यात आले आहेत. कुडाळ येथील महिला हॉस्पिटलमध्ये ७० तर होमगार्ड येथे ६५ बेड तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नामवंत डॉक्टरनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. आ वैभव नाईक यानीही आपले नर्सिंग कॉलेज कोविड सेंटरसाठी दिले आहे. तसेच आपण भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना अन्य कोणत्या सुविधा आपल्या पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध होतील, याची विचारणा करीत अधिकाधिक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
