मालवण तालुक्यात कोरोना लसिकरणास पुन्हा सुरुवात..

१३०० लसिंचा पुरवठा

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक लस चा साठा संपल्याने बंद पडलेली लसीकरण मोहीम तालुक्यात १३०० लसचा पुरवठा करण्यात आल्याने आजपासून पुन्हा सुरू झाली. लस घेण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता दिसत असून नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आज लस घेण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची गर्दी दिसून आली. राज्यात कोरोना प्रतिबंधक लस चा तुटवडा जाणवत असतानाच मालवण तालुक्यातील लसचा साठाही संपल्याने दि. ७ एप्रिल पासून लसीकरण मोहीम बंद करण्यात आली होती. मात्र आता तालुक्याला लसीच्या एकूण १३०० डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. ही लस कोविशिल्डची असून यात मालवण ग्रामीण रुग्णालयाला ५०० डोस पुरविण्यात आले आहेत. तर तालुक्यातील आचरा, मसुरे, हिवाळे, गोळवण या चार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी २०० डोस उपलब्ध करण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे. या पूर्वीच्या लसीकरण मोहिमेत म्हणजेच दि. ७ एप्रिल पर्यंत तालुक्यात ५६०१ व्यक्तींना लसचा पहिला डोस देण्यात आला. तर ८७१ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर आज लस उपलब्ध झाल्यावर पुन्हा सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेस ४५ वर्षे वयावरील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सकाळच्या सत्रात १३० जणांनी लस घेतली. तर दुसऱ्या सत्रात सायंकाळी ३ ते ५ या वेळेतही लसीकरण सुरू होते.

You cannot copy content of this page