शिवसेनेने संपवलेला दहशतवाद केसरकरांनी पुन्हा जन्माला घातलाय…

रुपेश राऊळ यांचा गंभीर आरोप:उद्घाटनाच्या कामांचा पाऊस पडत असला तरी मतदार केसरकर यांच्या माहोलाला बळी पडणार नाय..

⚡सावंतवाडी ता.१४-: पंधरा वर्षे आमदार आणि आठ वर्षे मंत्रीपद भूषवूनही आठ माणसांनाही रोजगार देऊ न शकलेले मंत्री केसरकर त्यांच्या थंड दहशतवादाने पंधरा वर्षाचे अपयश झाकण्यासाठी ही उद्घाटने करुन उद्घाटनाच्या कामांचा पाऊस पडत असला तरी सुज्ञ मतदार केसरकर यांच्या या माहोलाला बळी पडणार नाहीत असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

ते सावंतवाडी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, विनोद काजरेकर, बाळू माळकर, प्रशांत बुगडे, नामदेव नाईक, पुरुषोत्तम राऊळ, सिताराम राऊळ आदी उपस्थित होते.

दीपक केसरकर यांच्याकडून निवडणुकीपूर्वी विकास कामांचा पाऊस पडला जात असून येणाऱ्या काळात केसरकर यांना प्रचार करायची गरज नसल्याचे भासवले जात आहे दुर्दैवाची बाब म्हणजे दर निवडणुकीला दर वेळेला हा अनुभव मतदारांनी घेतला असून त्यांनी सुरू केलेला विकास कामाचा धडाका हा दडपशाही हुकूमशाही आणि स्थानिकावर अन्याय करून जनतेला मारून मुटकून विकास करण्याचा प्रकार वेळागर मध्ये झाला असून केसरकर यांची पंधरा वर्षाची कारकीर्द आता संपुष्टात आणा असे आवाहनही त्यांनी यावेळी जनतेला केले.

या जिल्ह्यातील दहशतवाद शिवसेनेने थांबवला असून त्याला पुन्हा जन्माला घालण्याचे काम मंत्री केसरकर करत असल्याचा आरोप राऊळ यांनी केला ते म्हणाले वेळागरवासीयांना सर्वसामान्यांना वेटीस धरून शेतकरी रहिवाशांची दिशाभूल करून प्रशासन आणि पोलिसाला हाताशी धरून जो प्रकार काल करण्यात आला तो चुकीचा असून सर्वे नंबर 39 वगळण्याचे कुठलेही पत्र प्रशासनाकडून दिलेले नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सर्वसामान्य जनतेसाठी विकास करत असताना जनतेला काठ्या लाठ्या मारून कोणासाठी विकास करत आहात ? दरम्यान पर्यटन मंत्री महाजन यांना चुकीची माहिती केसरकर देत असून 32 वर्षे हा लढा सुरू आहे हा विरोध कालचा नाही तर वारंवार जमिनी मधील सर्वे ३९ नंबर वगळण्याची मागणी केली जात असताना तसेच घरे शेती वगळा अशी रास्त मागणी करत असताना केवळ स्वतःच्या नातेवाईकाला नातेवाईकाच्या जमिनीत जाणारी वाट मिळावी म्हणून हे प्रकार होत असल्याचा गंभीर आरोप रुपेश राऊळ यांनी मंत्री केसरकर यांच्यावर केला आहे.
दरम्यान माडखोल- सातोळी बावळट मार्गे बांदा रस्ता कॉँक्रिटीकरणास जनतेचा विरोध असून जनतेला विश्वासात न घेता हा रस्ता केला जात आहे .तर संकेश्वर रेडी असा रस्ता न करता तो संकेश्वर बांदा असा करण्याचा घाट केसरकर घालत असल्याचाही आरोप त्यांनी केला, यामुळे सावंतवाडीतील व्यापाऱ्यांची बाजारपेठ लयास नेली जात असून शहरातून रस्ता न गेल्यास व्यापार आणि पर्यटन कसा वाढणार ?असा सवाल ही त्यांनी यावेळी केला आहे
दरम्यान पराभव नजरेसमोर दिसू लागल्याने बॅनर्स आणि जाहिरात बाजी केसर करा ना करावी लागत असल्याची टिका त्यांनी केली.

You cannot copy content of this page