विष्णु मुंज यानी उपोषणाचा दिला होता इशारा
दोडामार्ग-: दामोदर मंदिरा नजिक असलेल्या नदीच गाळ काढण्याची आग्रही भुमिका भेडशी ग्रामस्थ विष्णू मुंज व सिद्धेश पांगम,गोविंद शिरसाट यानी निवेदनाद्वारे केली होती तसेच ग्रामविकास कमिटी भेडशी भाऊ टोपले व ग्रामपंचायतीने ही पाठपुरावा केला होता.परंतु काम चालू होण्यास दिरंगाई होत असल्याने सिद्धेश पांगम व विष्णू मुंज यानी वारंवार संपर्क करुन कामाचे गांभीर्य दाखवून दिले तसेच विष्णू मुंज यानी उपोषणाच इशारा दिला होता. याची तातडीने दाखल घेऊन काल मशीन कामाच्या ठिकाणी हजर झाले.त्या वेळी नविन वर्षाचा शुभ मुहूर्तावर श्रीफळ वाढून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जेष्ठ ग्रामस्थ राजन मुंज ग्रामविकास कमिटी अध्यक्ष भाऊ टोपले, सिद्धेश पांगम, विष्णू मुंज, वासुदेव मुंज, निलेश तळंणकर, अभिजित कुबडे, प्रसाद बोंद्रे, मनोज गोलम, सौरभ देऊलकर तसेच जलसंपदा विभागाचे कवीटकर व अन्य सहकारी उपस्थीत होते.
