सावंतवाडी तालुक्यात आज ४१ रूग्ण सापडले..

*💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ४१ रुग्ण सापडले असून, शहरात ११ तर ग्रामीण भागात ३० रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात बाहेरचा वाडा आणि शिरोडा नाका येथे प्रत्येकी एक – एक, सालईवाडा ४, खासकीलवाडा ३, न्यू खासकीलवाडा २ तर ग्रामीण भागात नेमळे, कलंबिस्त, पाडलोस, शेर्ले, तळवडे, कुणकेरी, माडखोल, आंबोली या भागात प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला आहे. तर मळगाव २, बांदा ३, नेतर्ड ७, माजगाव ३, कोंडूरा ३, कोलगाव ४ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात १५९ सक्रिय रुग्ण आहेत.

You cannot copy content of this page