परशुराम उपरकर यांची मंत्री केसरकरांवर टीका: खोटी काम करणाऱ्यांना साईबाबा कधीही आशीर्वाद देत नाही..
⚡सावंतवाडी ता.१२-:* निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर विकास कामांची उद्घाटने सुरू, मात्र उद्घाटनाचे नारळ फुटले की लोकप्रतिनिधींन निवडणुकीचा फंड गोळा करायला मोकळे झाले ,अशी जोरदार टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर आज केली.
दरम्यान सातोळी येथील तिथल्या स्थानिक नागरिकांना विचारात न घेता त्यांचे प्रश्न न सोडवता त्यांच्या जमिनीचे संपादन न करता आपल्या जमिनीतून गाडी जावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. मात्र रातोरात येथील नागरिकांनी मंडप व तो ब्रिज उधळून लावला. साईबाबा चांगल्या काम करणाऱ्यांना आशीर्वाद देत असतात परंतु अशा प्रकारचे ग्रामस्थांना धुडकून लावून काम करणाऱ्यांना साईबाबा आशीर्वाद देत नाहीत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
