मंत्री केसरकर: खुनाच्या आरोपात सहा महिने जेलमध्ये असलेल्या लोकांनी मला शिकू नये..
सावंतवाडी ता.१०-: तालुक्यातील गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या पाटबंधारे विभागाच्या शिरशिंगे या महत्वाकांक्षी धरण प्रकल्पाला विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे आठ गावे सिंचनाखाली येणार असून पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
दरम्यान खुनाच्या आरोपात सहा महिने जेलमध्ये असलेल्या लोकांनी मला शिकू नये मी शांत आहे याचा अर्थ वेगळा काढू नये मला कोणाशी राजकीय संघर्ष करायचा नाही जर तसा प्रयत्न झालास मला आक्रमक भूमिका पुन्हा घ्यावी लागेल असा इशाराही मंत्री दीपक केसरकर यांनी नाव न घेता राजन तेली यांना दिला आहे.
