रुपेश राऊळ: केसरकर यांच्या घरासमोर होणाऱ्या बेरोजगारांच्या आंदोलना ठाकरे सेनेचा पाठिंबा..
⚡सावंतवाडी ता.१०-:
मंत्री दीपक केसरकर यांची सिंधू रत्न योजना फसवी असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक ताडपात्री खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती देऊ नये निधी नसल्याचे कारण सांगून ताडपत्री नाकारल्याचे फुकट झाले आहे उघड झाले आहे त्यामुळे केसरकर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये अन्यथा शेतकऱ्यांस सोबत आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिला.
दरम्यान अशा फसवल्या गेलेल्या शेतकऱ्यांनी आपणाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले ते आपल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकारांची बोलत होते.यावेळी विनोद ठाकूर उपस्थित होते
सिंधू रत्न समृद्धी योजनेअंतर्गत प्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेअंतर्गत निंबळे गावातील गजानन बाबुराव पाटकर यांना खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती प्रदान करण्याचे पत्र पाठवण्यात आले मात्र प्रत्यक्षात ताडपत्री खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांना या ताडपत्रीसाठी निधी नसल्याचे सांगून माघारी पाठवण्यात आले याबाबतचे पत्र रुपेश राऊळ यांनी पत्रकारांना दाखवले कशाप्रकारे सिंधू रत्न समृद्ध योजनेतून फसवणूक केली जाते याचेही उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
तर शुक्रवारी 11 ऑक्टोबरला होणाऱ्या बेरोजगारांच्या आंदोलनात सहभागी होणार
2019 साली मंत्री दीपक केसरकर यांनी आंतरराष्ट्रीय डाटा कंपनीच्या उद्योजकाला सावंतवाडी येथे आणून जिमखाना येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी सुरू केली यामध्ये 210 जणांना बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या मात्र गेले तीन महिने त्यांचा पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळालेली नाही. असे बोगस उद्योजक आणून दीपक केसरकर यांनी बेरोजगारांची फसवणूक केली आहे हे बेरोजगार युवक युवती शुक्रवारी ऑक्टोबर 11 ऑक्टोबरला मंत्री केसरकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलनासाठी बसणार आहेत या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा सक्रिय पाठिंबा असून या युवकांच्या पाठीशी पक्ष संघटना उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
एक लाख सेट टॉप बॉक्स देण्याचे आश्वासन यावेळी या कंपनीमार्फत केसरकर यांनी दिले होते केसरकर यांनी ह्या कंपनीच्या उद्योजकाला या ठिकाणी आणले असून बेरोजगार युवक युवतींच्या थकलेल्या पगाराला केसरकर जबाबदार आहेत असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले
