मालवण : (प्रतिनिधी)
मालवणच्या माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांनी मालवण नगरपालिकेकडे केलेल्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या मालवण देऊळवाडा येथे सातेरी मंदिर येथील रानडे घरानजीकच्या पाणंद काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आश्विनी मराळ व विजया परब यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेविका पूजा करलकर यांच्यासह विजया चव्हाण, मिलन मराळ, प्रमोद मराळ, दिव्या चव्हाण, शुभांगी डुंबरे, दिव्या वीर, जागृती मराळ, विजया परब, प्रणिता मराळ, अश्विनी मराळ, तनुजा मराळ, गायत्री मराळ, शिल्पा मराळ, बाळा चव्हाण प्रणाली चव्हाण सुगंध वीर, निकिता आचरेकर, शितल मराळ, महेश हडकर आदी उपस्थित होते.
