⚡वैभववाडी ता.०३-: चिंचवली येथील प्रतिष्ठित रहिवासी नागरीक चंद्रकांत कांबळे यांच्या पत्नी तसेच आंबेडकरी चळवळीतील सक्रिय युवा कार्यकर्ते मनोज चंद्रकांत कांबळे यांच्या मातोश्री कालकथीत दीपाली चंद्रकांत कांबळे यांचे मुंबईत दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कालकतीत मातोश्री दिपाली चंद्रकांत कांबळे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी चिंचवली येथे अंतिम संस्कार करण्यात आले.या दुःखद घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पती मुलगा मुलगी जावई सून नातवडे असा मोठा परिवार आहे.
दीपाली कांबळे यांच अल्पशा आजाराने दुःखद निधन…
