मातृत्व आधार फाऊंडेशनकडून दिन दलितांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न…

संतोष लुडबे:मालवणातील भंडारी ए.सो.हायस्कूलमध्ये दप्तर वाटप कार्यक्रम संपन्न..

मालवण दि प्रतिनिधी
पाच वर्षांपूर्वी समाजहिताच्या दृष्टिकोनातून मालवणात स्थापन झालेल्या मातृत्व आधार फाउंडेशनने निरपेक्ष बुद्धीने सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक उपक्रम राबवितानाच गोरगरीब, दिन दलितांचे अश्रू पुसण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात तर गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले. यापुढेही सामाजिक जाणीवेतून मातृत्व आधार फाउंडेशन अशाच पद्धतीने उपक्रम राबविल, असे प्रतिपादन मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल येथे मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने दप्तर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी व्यासपीठावर मातृत्व आधार फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कांदळगावकर, बिर्ला कंपनीचे सेवानिवृत्त सुपरवायझर रमाकांत पाटकर, सौ. सुहासिनी पाटकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, मातृत्व आधार फाउंडेशनचे संचालक दादा वेंगुर्लेकर, सोनाली पाटकर, टोपीवाला हायस्कुलच्या शिक्षिका ज्योती तोरसकर, ऋत्विक सामंत, किसन मांजरेकर, पर्यवेक्षक आर डी. बनसोडे आदी उपस्थित होते.

प्रारंभी मुख्याध्यापक श्री. तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी रमाकांत पाटकर यांच्या आर्थिक योगदानातून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी महेश कांदळगावकर, दादा वेंगुर्लेकर यांची समायोचित भाषणे झाली. शेवटी आर. डी. बनसोडे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page