मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ – कातवड जोईवाडी येथील श्री देवी नवदुर्गा मंदिरात नवरात्रौत्सव सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता घटस्थापना होणार आहे. तसेच नऊ दिवस सायंकाळी ७ वाजल्यापासून पोथीवाचन, आरती, भजन, गरबा आदी कार्यक्रम होणार आहेत. तर शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता होमहवन व महाप्रसाद होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन नवदुर्गा व्यवस्थापक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
