आर. आर. (आबा) पाटील स्मार्टग्राम स्पर्धेअंतर्गत तेर्सेबांबर्डे गाव प्रथम…

⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ तालुक्यातील आर. आर. (आबा) पाटील स्मार्टग्राम स्पर्धेअंतर्गत तेर्सेबांबर्डे या गावाला प्रथम क्रमांकाचे १० लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले आहे. तेर्सेबांबर्डे गावाला मानाचा पुरस्कार प्राप्त सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
रुपेश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पारितोषिक मिळाल्याबद्दल फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी सरपंच रामचंद्र परब, उपसरपंच रोहिणी हळदणकर, सदस्य संतोष डीचोलकर, सदस्य गुणाजी जाधव, सदस्य अजय डीचोलकर, सदस्य महेंद्र मेस्त्री, सदस्या प्रणाली साटेलकर, सदस्या माधवी कानडे, ग्रामसेवक भूषण बालम, शिपाई निलेश सडेकर, डेटा ऑपरेटर छाया डीचोलकर, मुख्यमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी शुभम कानडे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page