मालवण, दि प्रतिनिधी
आंबडोस गावचे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून माजी सरपंच विष्णू परब यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
सन २००७ ते २०१२ या काळात श्री. परब यांनी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यावेळी तत्कालीन सरपंच दिलीप परब, ग्राम स्वच्छता समिती अध्यक्ष रमेश नाईक, तंटामुक्ती उपाध्यक्ष शशिकांत नाईक, तत्कालीन उपसरपंच दिगंबर नके यांच्या सोबतीने तंटामुक्ती गाव पुरस्कार प्राप्त केला. नुकत्याच झालेल्या आंबडोस ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये विष्णू परब यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून प्रशांत नाईक यांची सचिव पदी नवनिर्वाचित पोलीस पाटील समीर परब यांना पदभार देण्यात आला. सल्लागार म्हणून वासुदेव वरवडेकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी गावच्या सरपंच सुबोधिनी परब, उपसरपंच रामदास नाईक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
