दोन दिवसानंतर भरली बाजारपेठे
देवगड : प्रतिनिधी दोन दिवसाच्या लॉकडाऊन नंतर सोमवारी देवगड-जामसंडे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती.दोन दिवसांच्या शुकशुकाटानंतर रस्त्यावर व बाजारपेठांमध्ये गजबजाट पसरला होता. शनिवार, रविवार या दोन दिवसांचे विर्केड लॉकडाऊन शासनाने जाहीर केल्यानंतर दोन्ही दिवशीही बाजारपेठा बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता.मात्र विकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसत होती. मंगळवारी गुढीपाडवा असल्याने खरेदीसाठी देवगड जामसंडे बाजारपेठांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. रस्त्यावर वाहनांबरोबरच नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ होती यामुळे देवगड कॉलेजनाका, ग्रामीण रूग्णालय या ठिकाणी टड्ढ\िक जामचेही प्रसंग निर्माण झाले होते. गुढीपाडव्या साठी काठी, \ुले, हार, पुजा साहित्य, गोड पदार्थ, किराणा बाजार, भाजी आदी खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये आले होते.मात्र व्यावसायिकांकडूनही कोरोना नियमावलींचे पालन करूनच खरेदी विक्री सुरू होती. विकेंड लॉकडाऊनमुळे दोन दिवस एस्टी सेवाही ठप्प होती.सोमवारपासून देवगड आगारातून एस्टीच्या पुर्ववत \ेèया सुरू झाल्या यामुळे एस्टी स्थानकातही गजबजाट होती. \ोटो-दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊननंतर सोमवारपासून देवगडमधील बाजारपेठा गजबजल्या.जामसंडे बाजारपेठेतील चित्र (छाया:वैभव केळकर)
