मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांची तहसीलदारांकडे मागणी*
*💫सावंतवाडी दि.१२-:* तालुक्यात कोरोना आजारासोबत आता माकड तापाने देखील डोके वर काढले आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात माकड तापाची तपासणी करण्यासाठी असलेले कार्यालय त्वरित सुरू करावे, तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषदे मार्फत जनजागृती करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केली आहे. तसेच तालुक्यातील कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव बघता कास येथील कोव्हिड सेंटर त्वरित सुरू करण्यात यावे तसेच रेल्वे द्वारे अनेक चाकरमानी तालुक्यात येत असल्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी गुरुदास गवंडे यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
