निलेश राणेंनी घेतले बांद्याच्या बाप्पाचे दर्शन…

बांदा/प्रतिनिधी
माजी खासदार तथा भाजपचे युवा नेते निलेश राणे यांनी आज येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बांद्याच्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार, उपाध्यक्ष आबा धारगळकर, भाजप सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, युवामोर्चा सावंतवाडी तालुकाध्यक्ष मकरंद तोरसकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, प्रसाद वाळके, ऋषी हरमलकर, साईनाथ धारगळकर, निलेश उर्फ पापू कदम यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंडळाने केलेल्या सजावटीचे श्री राणे यांनी कौतुक केले. यावेळी श्री राणे यांचा मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
त्यानंतर श्री राणे यांनी शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले.

You cannot copy content of this page