⚡बांदा ता.१५-: तळवडे सावंतवाडी येथील जनता विद्यालयात 1988 मध्ये एसएससी बॅच शिकून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर करुन आपल्या शाळेतील सुखद आठवणींना उजाळा दिला. व्हाट्सअॅपच्या माध्यमातून वर्षभर एकत्रित आलेल्या या मित्र-मैत्रिणी अखेर गणेश चतुर्थीच्या काळात एकत्रित आल्या.
तळवडे येथील कुलकर्णी सभागृहात पार पडलेल्या गेट टुगेदर कार्यक्रमात विनिता बगळी (पूर्वाश्रमीची वनिता मालवणकर), गुरुनाथ परब, अतुल फेद्रे, प्रभाकर कांडरकर, श्रीकृष्ण मालवणकर, यशवंत लोके, प्रसाद फेद्रे, मनोहर साळस्कर, संजय परब, सुभाष जाधव, जतीन दळवी, महादेव दळवी, यशवंत लोके, अतुल फेद्रे, संतोष राजू, लिंगाजी सावंत आदिनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
सर्वांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगताना सर्वच जण भावुक झाले. शाळेतील त्या वेळचे शिक्षक श्री. कशाळीकार, श्री. पाटकर, श्री. मालवणकर, श्री. घाडी आदी सरांच्या आठवणी ताज्या केल्या. सर्वांना एकत्रित आणणार्या वनिता मालवणकर, संजू परब, अतुल फेद्रे, संतोष आदिबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
फोटो—–
तळवडे ः अनेक वर्षानंतर एकत्रित आलेले तळवडे जनता विद्यालयाचे माजी विद्यार्थी.
