जिल्ह्यातील दहावी बारावी व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…!

⚡वैभववाडी ता.१४-: धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यातील दहावी बारावी व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम शनिवारी मोठ्या उत्साह संपन्न झाला.

या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी बारावी व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला जवळपास 200 हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी वैभववाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी तथा अध्यक्ष आर डी जंगले, नायब तहसीलदार विजय वरक, ग्राम विस्तार अधिकारी महादेव खरात उद्योगपती संतोष साळस्कर, संतोष गुरखे, कानू शेळके, केंद्रप्रमुख जंगले, पत्रकार संजय शेळके,विचारमंचचे सचिव एकनाथ जानकर खजिनदार दिलीप शेळके, रामचंद्र डोईफोडे, युवा कार्यकर्ते तथा ग्रा सदस्य नवलराज काळे, प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका कविता जंगले नरेंश खरात आदी पदाधिकारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोईफोडे सर यांनी केले तर आभार आंबा झोरे यांनी मानले.

You cannot copy content of this page