रामगड प्रशाळेची विद्यार्थिनी
*💫मालवण दि.१०-:* पंचायत समिती शिक्षण विभाग, मालवणच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या स्व:लिखित कवितवाचन स्पर्धेत प्रगत विद्यामंदिर रामगड प्रशालेची विद्यार्थिनी कु.सायली संदीप मुणगेकर (इ.आठवी) हिने मालवण तालुक्यातून दुसरा क्रमांक पटकावला. तसेच निबंध स्पर्धेत कु.भक्ती शिवप्रसाद पराडकर (इ. दहावी) हिने सुद्धा मालवण तालुक्यामध्ये दुसरा नंबर मिळवत यश मिळवले. प्रशालेच्या या दोन्ही मुलींचे पंचायत समिती मालवण, संस्थासंचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
