विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे यश प्राची तारी प्रथम
*💫मालवण दि १०-:* गुरूजी एज्युकेशन फाऊन्डेशन,मुंबई याच्यावतीने घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड आॅनलाईन परीक्षेत मालवण तालुक्यातील रामगड येथील प्रगत विद्यामंदिर या प्रशालेतील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले. यात इयत्ता नववी मधून प्राची उल्हास तारी हिने प्रथम क्रमांक मिळवला असून तिला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या परीक्षेत प्राची तारी हिच्यासह इयत्ता नववी मधून मंदार गुरव, शंकर मेस्त्री, प्राची घाडीगांवकर, अमृता घाडीगांवकर, अंकूर रूपये, इयत्ता आठवी मधून मिहीर गांवकर, इयत्ता सातवी मधून साक्षी जिकमडे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्था संचालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
