कोरोना योद्ध्या अंशकालीन स्त्री परिचरांचा सत्कार प्रेरणादायी-: संजना सावंत…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली पं स. सभापती-उपसभापती यांचा उपक्रम;तालुक्यातील 42 अंशकालीन स्त्री परिचरांचा केला सन्मान_

*💫कणकवली दि.१०-:* खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे व उपसभापती श्री.प्रकाश पारकर यांच्या संकल्पनेतून व संयुक्त विदयमाने कणकवली तालुक्यातील 42 अंशकालीन स्त्री परिचरांना साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले. खेडोपाड्यात ग्रामीण भागात अत्यंत तुटक्या मानधनात तरीही अत्यंत मेहनतीने व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचुन गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परीचर यांना एक समान रंगाच्या साडयांचे वाटप करण्यात आले. अंशकालीन स्त्री परीचर या दुर्लक्षीत राहीलेल्या असल्याने त्यांच्या मागण्याही पूढे शासन दरबारी मांडून त्यांच्या तुटपुंज्या वेतनाचाही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगीतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंशकालीन स्त्री परीचरानी स्थानीक पातळीवर कोणती कामे व खबरदारी घेण गरजेचे आहे हे देखील आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.तसेच त्यांची जबाबदारी व घ्यावयाची काळजी याबातही मार्गदर्शन करण्यात आले. अंशकालीन स्त्री परीचर हया देखील कोराना योदध म्हणूनच स्थानीक पातळीवर मोठया हिंमतीने काम करीत असून यापूढेही कोरोनाच्या महामारीत त्यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारे काम करावे यासाठी प्रोत्साहन व त्यांचा सन्मान म्हणून साडयांचे वाटप करून त्यांना सन्मानित करण्यात येत असल्याचे सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर यांनी सांगीतले. खासदार नारायण राणे यांचे विचार घेवून यापूढेही समाजातील अशा उपेक्षीत घटकांसाठी काम करत रहाणार असल्याचेही सभापती रावराणे म्हणाले. यावेळी अशंकालीन स्त्री परीचर यांना त्यांची ओळख असणारे ओळखपत्रही देण्यासाठी जि.प कडून प्रयत्न करणार असल्याचे तसेच अशा प्रकारचा ड्रेस कोड संपूर्ण जिल्हयासाठी करण्याचा मनोदय जि.प.अध्यक्षा यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर जि.प.अध्यक्षा सौ संजना सावंत,सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर,पं.स. सदस्य मिलींद मेस्त्री,सुचीता दळवी, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, सहा. गटविकास अधिकारी अभिजीत हजारे, हे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विस्तार अधिकारी श्री सूर्यकांत वारंग यांनी तर आभार गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी मानले.

You cannot copy content of this page