आम. वैभव नाईक यांचा अखंड उपक्रम:मंदार शिरसाट यांनी घरोघरी जाऊन केले वाटप..
कुडाळ : गणेशोत्सवा निमित्त आमदार वैभव नाईक गेली अकरा वर्षे कुडाळ मालवण मतदारसंघात पूजा साहित्य वाटप करत आहेत. नगरसेवक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी साहित्य त्यांच्या प्रभाग क्र मध्ये घरोघरी जाऊन वितरित केले.
कोकणात गणेश उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो आणि गणेशोत्सवानिमित्त गेली ११ वर्षे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक व कुडाळ मालवण मधील शिवसैनिक यांच्याकडून कुडाळ मालवण वासियांना श्री गणेश पूजेच्या विविध साहित्याची भेट देण्यात येते. भक्तिभावनेने आणि आपुलकीने जवळपास ७० हजार घरांमध्ये हि प्रेमाची भेट पोहोचवली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमदार वैभव नाईक आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण वासियांना श्री गणेश पूजेचे साहित्य वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक गावागावात त्याची सुरुवात करण्यात आली आहे.
प्रत्येक गावातील शिवसैनिक भक्तिभावाने मेहनत घेत आहेत. रात्र रात्र जागून शिवसैनिक हे साहित्य पिशव्यांमध्ये पॅक करून उत्साहाने घराघरात पोहचवित आहेत. कुडाळ शहरात प्रभाग क्र १४ मध्ये सुद्धा नगरसेवक मंदार शिरसाट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घसरोघरी जात हे पूजा साहित्य घरपोच केले. प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकानी आनंदाने ही भेट स्वीकारली आहे.
