बंद स्ट्रीट लाईट संदर्भात मळगाव ग्रामस्थांचा ग्रामपंचातीसमोर ठिय्या…

मळगाव सरपंच यांना धरले धरत विचारला जाब..

सावंतवाडी : सहदेव राऊळ : गेले सहा महिने मळगाव गावातील बंद असलेली स्ट्रीट लाईट गणेश चतुर्थी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असतानाही स्ट्रीट लाईट बंदच असल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर आज मळगाव ग्रामपंचातीसमोर ठिय्या मांडत मळगाव सरपंच यांना चांगलेच धारेवर धरले.
गेले सहा महिने मळगाव गावातील सर्व वाड्यातील स्ट्रीट लाईट बंद आहे. वारंवार तक्रार करूनही स्ट्रीट लाईट सुरु गेली जात नव्हती. विचारले असता
स्ट्रीट लाईटचे काम करणारा कर्मचारी नसल्याचे कारण सांगितले जात होते. मात्र आता गणेश चतुर्थी सण एका दिवसावर आल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर धडक देत स्ट्रीट लाईट अजूनही का सुरु झाली नाही याबाबत सरपंच यांना जाब विचारला. यावेळी 13 सदस्यांपैकी एकही सदस्य उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत असली बिन कामाची ग्रामपंचायत बॉडी आम्हाला नको, असा सवाल उपस्थित केला. ही बंद असलेली सर्व स्ट्रीट लाईट येत्या दोन दिवसत सुरु नाही झाली तर सोमवारी 9 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत उघडू देणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला. यावेळी मळगाव ग्रामस्थ पांडुरंग राऊळ, पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर, महेंद्र पेडणेकर, ऍड. निधी दाभोळकर, सिद्धेश आजगावकर, निखिल राऊळ, महेश राऊळ, सुदेश राऊळ, सुमेश राऊळ, संदीप राऊळ, सागर राणे, विश्वनाथ गोसावी, सहदेव राऊळ, विकास नाईक, सुरज गवंडे, बाळा राणे, नाना राणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page