शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार वाटप..
⚡दोडामार्ग ता.०४-: तालुक्यातील २०० भजन मंडळाना गुरुवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता भजन साहित्याचे वाटप केले जाणार आहे.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते साहित्य वाटप होईल.येथील बाजारपेठेतील परमेकर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रत्येक भजन मंडळाने मंडळातील किमान पाच सदस्यांसह उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख राजन पोकळे, अशोक दळवी सुरज परब, महीला जिल्हाप्रमुख नीता सावंत – कविटकर आदी उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांसह युवासेना, युवतीसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे व आपल्या गावातील, शहरातील, विभागातील भजन मंडळाना उपस्थित ठेवावे असे आवाहनही श्री.गवस केले आहे.
