⚡बांदा ता.०४-: येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक जे. डी. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने बांद्याचे माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी गुरुनाथ सावंत, सुनील धामापूरकर, बाळु मोर्ये, पत्रकार तथा बांदा केंद्रशाळेचे माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर आदी उपस्थित होते. श्री पाटील यांनी आपल्या कार्यकाळात अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून प्रशाळा नावारूपास आणली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्याना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बांदावासियांसाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगत जावेद खतीब यांनी पाटील यांना शैक्षणिक कार्याबाबत मिळालेल्या पुरस्काराचे अभिनंदन केले.
