मळेवाड चिमुकली मृत्यू प्रकरणी जामीनावर सुटका…

⚡सावंतवाडी ता.२६-: मळेवाड येथील चिरेखाण येथील चिमुकल्या मुलीचा अपघाती मृत्यू प्रकरणी अटक केलेल्या दत्ताराम शंकर राऊळ,इराप्पा अमराप्पा गौडा,प्रकाश कृष्णपा लमाणी याची न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयाच्या जामीनावर मुक्तता केली.
सदर कामी पुढील तपासा करिता दोन दिवसाची पोलीस कोठडीची मागणी तपासणीक अंमलदार यांनी केली होती. परंतु पोलीस कस्टडीसाठी नमूद कारणे ही निरर्थक असून पोलीस कस्टडी करिता सबळ नसल्याचे अँड. परिमल नाईक यांनी मे. न्यायालय्याच्या निदर्शनास आणून दिले सबब पोलीस कस्टडी नाकरण्यात आली.
आरोपीच्या वतीने अँड. परिमल नाईक व त्यांना सहाय्य अँड सुशील राजगे, अँड. रश्मी नाईक, अँड. अमिषा बांदेकर, अँड. शंभवी तेंडोलका यांनी केले.

You cannot copy content of this page